खंबाळा येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या




वैजापूर -तालुक्यातील खंबाळा येथील एका ३२ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली.
आबासाहेब जगन्नाथ वाडगे (रा. खंबाळा, ता. वैजापूर) असे घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबासाहेब वाडगे हे खंबाळा येथील रहिवासी होते. शेती करून ते उपजीविका भागवत. दरम्यान  गुरुवारी दुपारी घायगाव शिवारातील म्हस्की रोडलगत असलेल्या शरद रायभान इंगळे यांच्या गट क्रमांक २५६ मधील शेतात त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
घटनेनंतर संतोष वाडगे यांनी त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास  हवालदार किसन गवळी करीत आहेत. दरम्यान आत्महत्ये मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या