टक्केवारीच्या खेळात अडकला शेवगावचा विकास अतिक्रमणे काढूनही विकासाला मात्र खिळ


शेवगाव प्रतिनिधी- शेवगाव शहरात अनधिकृत ठिकाणी असलेले अतिक्रमणे मागील वर्षी गाजावाजा करून काढण्यात आली. गावचा विकास व रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शेवगावची बाजारपेठ उध्वस्त करण्यात आली. मात्र टक्केवारीच्या खेळात शेवगाव शहराच्या विकासाला खिळ पडल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आणि स्थानिकच्या पदाधिकाऱ्यात बेबनाव असल्याने शेवगाव चा विकास मात्र होऊ शकलेला नाही ही सत्य परिस्थिती आहे. 

शहरातील अतिक्रमणात साडेनऊशे दुकानदार विस्थापित झाले. त्यांच्यासाठी कोणतेही बाजार संकुल अद्याप तरी नगरपालिका उभारू शकलेली नाही. अतिक्रमणात दुकाने गेल्याने काहींनी शहराचा मार्ग निवडला तर काहींनी इतरांच्या हाताखाली कामाला जाण्यास सुरुवात केल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले, याला सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारीच असल्याचा आरोप सर्वसामान्य दुकानदार, नागरिक करत आहेत. शहरातील नाल्याची कामे पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे होते तेही झाले नाही रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे होते तेही अद्याप झाले नाही रस्ता रुंदीकरण व नालीचे नवीन बांधकाम टक्केवारीच्या खेळात अडकल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. कंत्राट दाराला दिलेला ठेका पुन्हा बदलत जात असल्याने कंत्राटदार सुद्धा या परिस्थितीत हदबल झालेली दिसतात. कामे कशा पद्धतीने करायची हे सुद्धा कंत्रातदार ठरू शकत नाहीत. सुरू झालेले काम बंद करून कंत्राटदार आपले साहित्य इतर ठिकाणच्या कामावर पोहोच करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
विकासाच्या नावाखाली शेवगाव शहरातील कोट्यावधी रुपयांची बाजारपेठ अनाहूतपणे नाहीशी करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी हेच याला जबाबदार असल्याची भावना शेवगाव शहरातून व्यक्त होत आहे.
----
नगरपालिका गाळे उभारणार कधी
शेवगाव नगरपालिकेच्या अधिकृत जाग्यावर धन दांडग्यांनी अतिक्रमण करून मोठमोठे गाळे उभारलेले आहेत. या जाग्यावरील गाळे मोकळे करून त्या ठिकाणी व्यापारी संकुल नगर पालिका बांधू शकते मात्र प्रशासक याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. शेवगाव शहरात नगरपालिकेच्या ठिकाणी पाच ते सहा भूखंड असून त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधले गेले तर शेवगाव शहरातील व्यापारी वर्गाला याचा फायदा होऊन बाजारपेठ वाढीस चालना मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या