टाकळीभान टेलटैंकला दुसरे आवर्तन तातडीने सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन



टाकळीभान: येथील शेतकऱ्यांनी टेल टॅंक मधून शेतीसाठी बंद केलेले दुसरे आवर्तन तातडीने सोडविण्यासाठी उपविभागीय जलसंपदा विभाग कार्यालय व प्रांत अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांना निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जलसंपदा विभागाने शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तने मागणी अर्ज भरुन घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकासाठी शेती पिकाला खर्च केला आहे. भंडारदरा व टाकळीभान टेलटँक शेतीसाठीचे दुसरे आवर्तन चालु होते, परंतु राज्यसरकारच्या आदेशाने चालु दुसरे आवर्तन तातडीने बंद करण्यात आले आहे.
      भंडारदरा धरणातुन दुसऱ्या आवर्तनामधुन नेवासा तालुका व राहता तालुक्यात शेतीसाठी पुर्ण भरणे केले, परंतु श्रीरामपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना मात्र दुसऱ्या आवर्तनातुन प्रशासनाने वंचीत का ठेवले ? असा प्रश्न असून टाकळीभान टेलटँकमध्ये सद्यस्थितीला १२ मिटरच्या पुढे पाणी साठा असुन टेलटँकच्या लाभधारक शेतकऱ्यांना दुसरऱ्या आवर्तनाला २ ते २.५ मिटर पाणी लागते, तरी दुसरे आवर्तन करुन टेलटँक मध्ये ९ ते १० मिटर पिण्यासाठी पाणी शिल्लक राहिल. टेलटँकच्या लाभधारक शेतकऱ्यांना दुसरे आवर्तन सुटले नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होइल.
           तरी टाकळीभान टेलटँकमधुन लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे . तरी २ ते ३ दिवसात पाणी सोडण्या बाबत निर्णय न झाल्यास लाभाधारक शेतकरी हे प्रांत कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत. असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर टाकळीभान येथील शेतकरी काकासाहेब कोकणे, पंकज पटारे, मच्छिंद्र कोकणे, राहुल कोकणे, विलास बोडखे, निखिल पटारे, अभिमन्यू मगर, रणजीत मगर,राजेंद्र शिंदे, मिलिंद पटारे, आनंदराव धुमाळ, रामदास कांबळे, बापूसाहेब शिंदे, सुरेश पटारे, सचिन येवले, गोरक्षनाथ खंडागळे आदी शेतकऱ्यांनी दिला असून निवेदनावर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या