नेवासा(प्रतिनिधी) -जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू झालेल्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून चांगल्या क्वालिटीचा कांदा ही उपलब्ध होत असल्याने येथील हरिओम एंटरप्राइजेस च्या मार्फत रविवारी सुमारे तीस टन कांदा हा कंटेनरद्वारे दुबईला रवाना करण्यात आला.
हरिओम एंटरप्राइजेसच्या वतीने दुबईला निघालेल्या
कांद्याच्या पहिल्या कंटेनरचे पूजन नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी कांदा व्यापारी
हरिओम एंटरप्राइजेसचे अर्जुन पंडित व दीपक नाबदे अर्जुन वाबळे यांच्या वतीने सभापती नंदकुमार पाटील, संचालक अरुण शिंदे,राजेंद्र सानप,सुनील धायजे, नगरसेवक संभाजीराव धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील म्हणाले की माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने नेवासा येथे कांदा मार्केट सुरू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव येथे मिळत आहे,कांदा मार्केट मध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा उपलब्ध होत असल्याने परदेशातून त्याला चांगली मागणी होत आहे,कांदा उत्पादकांनी नेवासा मार्केट कमिटीलाच आपला कांदा घालावा यासाठी चांगला भाव देण्याचा प्रयत्न आमचे संचालक मंडळ करेल अशी ग्वाही यावेळी बोलतांना दिली.
नेवासा बाजार समिती आवारातील गाळा नंबर १६ मधील हरिओम एंटरप्राइजेसचे कांदा निर्यातदार व्यापारी अर्जुन पंडित म्हणाले की माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून एक महिन्यापूर्वी येथे कांदा मार्केट सुरू करण्यात आले.नेवासा मार्केटच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्यासाठी मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील व त्यांचे सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहे,कांदा मार्केट ला चांगल्या क्वालिटीचा कांदा उपलब्ध होत असल्याने आम्हाला देखील परदेशातून मागणी होत असल्याने आज प्रथमच या मार्केट मधून १२०० गोण्या सुमारे तीस टन कांदा येथून मुंबई व तेथून दुबईला जहाजाद्वारे रवाना होणार असल्याचे सांगितले.कांदा व्यापारी दीपक नाबदे यांनी उपस्थित कामगारांना पेढे वाटून उपस्थितांचे आभार मानले.
येत्या रविवारी ही कांदा खरेदी सुरू रहाणार -सभापती नंदकुमार पाटील
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने नेवासा येथील मार्केट कमिटीच्या आवारात दि.६ मे पासून कांदा खरेदी सुरू करण्यात आली.दर मंगळवार व गुरुवारी होणाऱ्या कांदा खरेदी विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता आता रविवारी ही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे सभापती नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलतांना जाहीर केले

0 टिप्पण्या