संगमनेर प्रतिनिधी - अहिल्यानगर येथील आर्थिक गुन्हे शाखेने शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक करून फरार असणारा विजय तबाजी काळे (वय ३९,रा घुलेवाडी)या मुख्य गुन्हेगाराला अटक केली आहे.
विजय काळे याने अनेक गुंतवणूक दारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्यामुळे त्याच्यावर मागील महिन्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून तो फरार झाला होता त्याचा पोलीस शोध घेत होते अखेर त्यास अहिल्या नगर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने 27 जून, 2026 रोजी अटक करून न्यायालयात उभे केले होते त्यास न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या गंभीर आर्थिक घोटाळ्याचा पुढील सखोल तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

0 टिप्पण्या