अल्पवयीन मुलांना दुचाकी द्याल तर दंडात्मक कारवाईस पालकांवर होणार गुन्हा दाखल - जीवन मोहिते



सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ठाण्यांतर्गत कठीण पूल कोऱ्हाळे,वडगाव निंबाळकर सोमेश्वरनगर ,वाकी, चोपडज ,पळशी ,मुरटी, मुरूम वानेवाडी या परिसरात शाळा महाविद्यालय आहेत सोमेश्वरनगर हे मुख्य बाजारपेठ सह मोठे शिक्षण संकुलन असल्याकारणाने विद्यार्थी संख्या जास्त आहे पालकांनी आपल्या अल्पवयीन शिकत असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन देऊ नये असे वडगांव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी गुरुवारी दिनांक २५ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितले तसेच जड वाहतूक करणारे वाहने त्यांनी आपल्या वाहनांचा वेग मार्गावर आलेल्या प्रत्येक गावामध्ये दिलेल्या नियमांचे पालन करत ठेवावा. गाड्यांना असलेले ब्लॅक फिल्मिंग ,फॅन्सी नंबर प्लेट बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा केली जाईल त्याचप्रमाणे ११२ वर चुकीचे फसवे कॉल करू नये असेही त्यांनी बोलताना सांगितले.

वडगा निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही गैरप्रकार ,११२ चुकीचा कॉल, अल्पवयीन मुलांना दुचाकी न देणे, अवैद्य धंदे खपवून घेतले जाणार नाही.
ए.पी.आय जीवन मोहिते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या