श्रीरामपूरच्या अप्पर अधिक्षक सोमनाथ वाकचौरेंकडून गुन्हेगारांवर कारवाई



 श्रीरामपूर  - शहर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सहा जणांच्या टोळीवर भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अन्वये वाढीव कलम लावून अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कारवाई स्थानिक पातळीवरील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी प्रभावी ठरेल.
अक्षय दादा चव्हाण (वय २१, रा. अकोले नाका), रोहित उर्फ कोकण भिकाजी शिंदे (वय २५, रा. अकोले नाका), संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय २५, गुंजाळवाडी), आदित्य संजय शिंदे (वय २१, गुंजाळवाडी), अभिषेक अशोक लोंढे (वय २२, अकोले नाका), साई रामपुरी गोसावी (अकोले नाका) अशी गुन्हा असलेल्या सहा जणांची नावे आहेत, हे सर्वजण संगमनेर तालुक्यातील आहेत.चव्हाण हा त्यांचा टोळीचा प्रमुख असून, त्याने त्यांच्या साथीदारांसोबत दरोडा, घातक हत्यार वापरून जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, दिवसा-रात्री घरफोडी, दखलपात्र गुन्हा करणे, खुनाचा प्रयत्न करणे, वाहन
चालकांना लुटणे आदी गुन्हे केले आहेत, गंभीर स्वरूपाचे ३० गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल आहेत. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकंडे प्रस्ताव पाठवला होता, हा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे.
'भान्यासं'चे कलम १११ हे संघटित नवीन कायद्याप्रमाणे भारतीय न्याय गुन्हेगारीसंदर्भात नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. मोक्का कायद्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी याकरिता असणारी शिक्षा या कलमात नमूद केलेली आहे. त्यानुसार गंभीर स्वरूपातील शिक्षेची तरतूद आहे. आरोपींनी यापूर्वी एकत्रितपणे दोन किंवा अधिक गुन्हे केले असल्यास हे कलम लावण्यात येते. अशी पोलिसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या