राहुरी प्रतिनिधी : - राहुरी शहर हद्दीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, २३ जून रोजी रात्री कुटुंबीयांसह झोपलेल्या मुलीचा २४ जून रोजी पहाटे दोनच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्याचे तिच्या वडिलांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला; मात्र मुलगी आढळून आली नाही.
यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋतिक सुरेश शिंदे (रा. मुलनमाथा, ता. राहुरी) याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक मुलगी व संशयिताचा शोध घेत आहे.

0 टिप्पण्या