श्रीरामपूरात घरफोडी, मंदिरात चोरी तिघे चोरटे कॅमेऱ्यात कैद


श्रीरामपूर  : शहरातील वॉर्ड नं.७, रामचंद्रनगर परिसरात घरफोडी तसेच, जवळ असणाऱ्या मंदिरातून देवीचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वॉर्ड (नं. ७) मधील रामचंद्रनगर येथे राहणाऱ्या सिमा नरेश सांगळे, (धंदा-किराणा दुकान), यांचे घर फोडून चोरट्यांनी ३० हजारांचा ऐवज चोरून नेला आहेत. सिमा सांगळे या वॉर्ड नं. १, कचेरीमागे राहतात. त्यांनी रामचंद्रनगर, वॉर्ड नं.७ येथे नवीन घर घेतलेले आहे. रात्री सदरचे घर लावून त्या जात असतात. सकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे दिसून आले. तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ३ अनोळखी इसम कॅमेऱ्यात चोरी करताना आढळून आले आहेत. तसेच, शेजारीच असणाऱ्या प्रशांत गोरख लाड यांच्या तुळजाभवानी मंदिरातील देवीचे पिवळ्या धातूचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मंदिरात चोरी करणारा एक इसम असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या