डिंभे धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेला अल्पवयीन मुलगा वाहून गेला; शोधकार्य सुरू




 डिंभे धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेला अल्पवयीन मुलगा वाहून गेला; शोधकार्य सुरू

निरगुडसर - पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ पिंगळदरा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. नुकत्याच दहावीत गेलेला प्रज्वल बाळासाहेब चासकर वय १५ हा डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागलेला नसून बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.


आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील प्रज्वल बाळासाहेब चासकर (वय १५) हा नुकताच नववीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तो आपल्या सोहम पडवळ, विराज चासकर, सोहम घोडेकर या मित्रांसह डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रज्वल हा कालव्याच्या पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून कालव्यात आणि परिसरात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सायंकाळपर्यंत प्रज्वलचा शोध लागलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या