अकोले : - तालुक्यातील दुर्गम पेढेवाडी येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील पोषण आहार आणि गॅस टाक्या शेगडी चोरीला गेल्याची फिर्याद ११ जून २०२६ रोजी अकोले पोलिसांत दाखल होती. या चोरीचा छडा अकोले पोलीसांनी लावला असून १ लाख १५ हजाराच्या मुद्देमालासह पेढेवाडी गावातीलच दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
पेढेवाडीत पोषण आहार चोरीस गेल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली, गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी पेढेवाडीतील मारूती रावजी कुलाळ (वय ३१), काळू चिंधू कुलाळ (वय ३५) या दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून भारत गॅसच्या दोन, एचपीची एक, अश्या तीन गॅस टाक्या, दिडशे किलो तांदूळ, गहू, मुगडाळ, साखर, तेल, मसूर, तेल मसाले व हिरो होन्डा मोटरसायकल असा १ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करत आहे.

0 टिप्पण्या