राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार...
मराठा समाजाच्या हक्कासाठी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेत सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र ‘मराठा आरक्षण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेला वेग मिळणार असून आरक्षणाची कायदेशीर बाजू अधिक प्रभावीपणे मांडली जाणार आहे. तसेच एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्या, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांशी संबंधित प्रश्नांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना अधिक जलद लाभ मिळण्यास मदत होणार आहे. ‘सारथी’ संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करून त्या अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही या कक्षामार्फत केले जाणार आहे. याशिवाय हैदराबाद गॅझेटमधील कुणबी नोंदींच्या पडताळणीसाठी विशेष कार्यपद्धती (SOP) राबविण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी, न्याय्य हक्कांसाठी आणि शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
Social Icons
नमस्कार, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या वतीने महिलांसाठी हिरकणी महिला मंच हे खुले व्यासपीठ सुरू करण्यात येत आहे. आज पासून या मंचसाठी सदस्य नोंदणी सुरू झाली असून आपल्या तालुक्यात जास्तीत जास्त महिला हिरकणी महिला मंचच्या सदस्य होतील, यासाठी ही लिंक जास्तीत जास्त फॉरवर्ड करा.... 🔺 राष्ट्र सह्याद्री हिरकणी महिला मंचाच्या सदस्यांसाठी... 👉 हळदी कुंकू, लकी ड्रॉ, विविध स्पर्धा, हॉलिडे फन, सहल, कला-कुसर उपक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर वेळोवेळी आयोजित केले जाणार आहेत... सदस्य नोंदणी वार्षिक शुल्क : ₹ 100/- 💁♀ सदस्य नोंदणीसाठी येथे क्लिक करा 👉
0 टिप्पण्या