कुकडी कालव्यात अज्ञात पुरुषासह महिलेचा मृतदेह




कर्जत : धालवडी (ता.कर्जत) शिवारात कुकडी कालव्याच्या येसवडी चारीत आवर्तनाच्या पाण्यात एक पुरुष आणि महिलेचा मृतदेह मिळून आला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. कुकडी कालव्यात दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. 
     पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि १० रोजी सकाळी कुकडी कालव्याच्या धालवडी-कुळधरण शिवारात पिण्यासाठी सुटलेल्या आवर्तनाच्या पाण्यात ५५ वर्षाचे अज्ञात पुरुष जातीच्या आणि ६५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह येसवडी चारीत आढळून आला. कुकडी कालव्यात पुरुष आणि महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. कर्जत पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत भेट देत दोन्ही मृतदेह ताब्यात घेत कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात धालवडीचे पोलीस पाटील सुनील पंडीत आणि कुळधरणचे शेतकरी गणेश जगताप यांच्या खबरीवरून अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या