श्रीरामपूर -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक हे राज्यसभेवर जाण्याचे संकेत मिळाले आहेत, तशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.काम केल्याची पावती मिळेल, अशी आदिक समर्थकांची भावना आहे. सत्ता आणि पदे मिळवण्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना अविनाश आदिक अद्यापही या सर्व त्या गोष्टींपासून दूर आहेत.
दरम्यान, राज्यभरासह नगर जिल्हा तसेच श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात अविनाश आदिक यांना मानणारे अगनिक कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त तसेच श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक तसेच अविनाश आदिक यांच्यावर नेते आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड विश्वास आहे.
संपूर्ण राज्यभरात प्रत्येक पक्षात मोठ्या प्रमाणात सत्ता संघर्षासंदर्भात तसेच पदे लाटण्यासाठी घडामोडी घडत असताना अविनाश आदिक तसेच अनुराधा आदिक यांनी मात्र उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचाही आदिक बंधू भगिनीवर मोठा विश्वास आहे. मात्र न्याय मिळत नसल्याची कार्यकर्त्यांची खंत आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी अविनाश आदिक यांच्या नेतृत्व गुणाची पारख करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती. आताही राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवून सुनेत्रा पवार यांनीही आदिकांवर विश्वास दाखविला आहे. पक्षनिष्ठा म्हणून आता मात्र अविनाश आदिक यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना राज्यसभेवर घेण्याचे वेध लागले आहेत.
स्किल तसेच कोणतेही राजकीय पाठबळ आणि राजकारणात लोकप्रियता नसलेल्या अनेकांना अनेक पदे तसेच काहींना थेट राज्यसभेवर घेतले गेले. त्या तुलनेत आदिक हे लोकप्रियतेत अव्वल क्रमांकावर आहेत. स्व. अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शब्दाखातर त्यांनी पक्षाची खूप मोठी धुरा खांद्यावर घेतली आहे.
यापूर्वी पक्ष नेतृत्वाने ज्यांना ज्यांना राज्यसभा तसेच काहींना विधान परिषदेवर घेतले त्यांच्यापेक्षा किंबहुना त्यापेक्षा अधिक अविनाश आदिक हे पक्षाशी आजपर्यंत प्रामाणिक आणि निष्ठा ठेवून आहेत, त्या तुलनेत अविनाश आदिक यांना मात्र न्याय मिळाला नसल्याची खंत ही आदिक यांच्या कार्यकर्त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
अविनाश आदिक यांना आता राज्यसभेवर घेऊन पक्ष नेतृत्व न्याय देईल, अशी अपेक्षा आदिक यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
हजारो साखर कामगार,लाखो महाराष्ट्र कृषक समाज यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अविनाश आदिक यांनी मोठ्या प्रमाणात काम करत पक्षाचे संघटन बांधले आहे.
सोशल मीडियावर आदिक यांच्या राज्यसभेवरील जाण्याच्या चर्चेने मात्र पुन्हा एकदा वातावरण ढवळले आहे.

0 टिप्पण्या