श्रीरामपूर : - तालुक्यातील वांगी येथे घरफोडी करून चार लाखाचे दागदागिने रोकड चोरून नेणारे अट्टल गुन्हेगार दोन जणांना एलसीबीने पकडले असून त्याच्याकडून ६ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वांगी येथील सोपान चंद्रभान थोरात (रा.वांगी, ता. श्रीरामपूर ) हे १६ मे रोजी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या वस्तीवर सकाळी साधारणाता १० ते १२ वाजेच्या दरम्यान जेवण करण्यासाठी गेले होते.त्याचवेळीला अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरांचे कुलूप तोडून ४ लाख ६ हजारांचे दागदागिने रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती.याबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा सखोल तंत्रशुद्ध पद्धतीने पोलीसांनी तपास करत मिळालेल्या गुप्त माहितीदारांमार्फत सदरचे चोरी करणारे हे घोडेगाव ते शनिशिंगणापूर (ता. नेवासा ) येथे जाणाऱ्या रोडच्या असल्याची माहिती मिळाली असता, त्यावेळी पोलिसांना पाहातच ते पळू लागले.मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांची विचारपूस केली असता, स्वरूप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे (वय ३० ) व दऱ्या पऱ्यांडा भोसले
(वय ३५, रा.अंतापूर ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर ), असे सागितले. आरोपीनी (दिघी ता.श्रीरामपूर) येथील चोरीची कबुली देत ५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व ४० हजारांची मोटारसायकल असा ६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
.......

0 टिप्पण्या