लोणी येथे दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; पारगाव पोलिसांत गुन्हा दाखल





 पारगाव  (प्रतिनिधी(-  आंबेगाव तालुक्यातील लोणी गावच्या हद्दीत जेजुरी-बेल्हा महामार्गावर रविवारी (दि. ८ जून) सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरीकडून बेल्ह्याकडे जाणारी पल्सर दुचाकी (एमएच १४ ईजे ६३७६) चालक प्रकाश बाबाजी दौड (रा. पोंदेवाडी, ता. आंबेगाव) हे भरधाव व निष्काळजीपणे चालवत असताना त्यांच्या दुचाकीने समोर जाणाऱ्या अॅक्टिव्हा स्कुटीला (एमएच १२ वायएम ०६४२) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात अॅक्टिव्हा चालक सुभाष रामभाऊ जाधव (वय ५२, रा. एकेरीमळा, पाबळ, ता. शिरूर) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच अपघातात दुचाकी चालक प्रकाश दौड यांनाही किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी शिवाजी रामभाऊ जाधव (वय ५६, रा. एकेरीमळा, पाबळ, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जढर (बकल क्रमांक २२५२) करीत असून प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या