#Gharkul घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळेना

घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास वाळू तात्काळ द्या; संदीप आसने यांची प्रशासनाकडे मागणी



श्रीरामपूर |

श्रीरामपूर तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येणारी मोफत ५ ब्रास वाळू अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने त्यांच्या घरकुल बांधकामांचा वेग मंदावला असून अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे श्रीरामपूर तालुका सोशल मीडिया सेलचे संयोजक तथा पत्रकार संदीप आसने यांनी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन प्रलंबित लाभार्थ्यांना तात्काळ वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

आसने यांनी निवेदनात नमूद केले आहे की, यापूर्वीही या प्रश्नाबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावेळी नदीपात्रात पाणी असल्यामुळे वाळू उपसा व वाहतुकीस अडचणी येत असल्याचे कारण प्रशासनाने दिले होते. मात्र सध्या नदीपात्रांमध्ये पाणी नसल्याने वाळू उपसा आणि वाहतुकीस कोणतीही अडचण उरलेली नाही.

असे असतानाही अनेक पात्र घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार मिळणारी मोफत वाळू अद्याप मिळालेली नसल्याने त्यांची बांधकामे रखडली आहेत. परिणामी लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून शासनाच्या घरकुल योजनेच्या उद्दिष्टपूर्तीलाही विलंब होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, महसूल यंत्रणा व संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन ज्या लाभार्थ्यांना अद्याप वाळू मिळालेली नाही, त्यांना प्राधान्याने मोफत ५ ब्रास वाळूचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतींकडून प्रलंबित लाभार्थ्यांची यादी मागवून नियोजनबद्ध पद्धतीने वाळू वितरणाची कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी (श्रीरामपूर विभाग) तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती श्रीरामपूर यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन घरकुल लाभार्थ्यांना तातडीने वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


#Shrirampur #ShrirampurNews #RashtraSahyadri #MaharashtraNews #GharakulYojana #PMAY #HousingForAll #HomeBeneficiaries #SandipAsane #BJP #FreeSandSupply #SandDistribution #RuralDevelopment #GramPanchayat #Tahsildar #GovernmentSchemes #MaharashtraGovernment #HousingScheme #CitizenVoice #LocalNews #AhmednagarNews #Ahilyanagar #DevelopmentNews #MarathiNews #BreakingNews #WebUpdate

#श्रीरामपूर #राष्ट्रसह्याद्री #घरकुलयोजना #घरकुललाभार्थी #मोफतवाळू #संदीपआसने #शासनयोजना #महसूलविभाग #ग्रामपंचायत #विकासकामे #महाराष्ट्रबातम्या #अहिल्यानगर #स्थानिकबातमी #जनतेचाआवाज #वेबअपडेट #ब्रेकिंगन्यूज #मराठीबातम्या #घरकुलबांधकाम #वाळूपुरवठा #प्रशासन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या