श्रीगोंदा, प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील शिपलकरवाडी (कौठा) येथे चोरट्यांनी एका रात्रीत धाडसी घरफोडी करत साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा एकूण 3 लाख 37 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. सलग घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी रात्री 11.30 ते 29 जून रोजी पहाटे 4.30 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दिपक रामदास दिवेकर यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेले सुमारे 6.50 तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे 3 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचे, चोरून नेले.याच रात्री चोरट्यांनी वेळू येथील रावसाहेब येडे यांच्या मालकीची एमएच-16 एबी-9848 क्रमांकाची मोटारसायकल लंपास केली. या दुचाकीची अंदाजे किंमत 10 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक खिळदकर यांनी पंचनामा करून तपासाची सूत्रे हाती घेतली.या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 648/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(4), 305 आणि 303(2) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. टी. भांडवलकर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळदकर करीत आहेत. स्थानिक नागरिकांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविणे, संशयितांवर करडी नजर ठेवणे आणि चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावण्याची मागणी केली आहे. चोरटे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत
ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ?
श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून घरफोडी, वाहन चोरी आणि बाजारातील पाकिटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका रात्रीत घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
.

0 टिप्पण्या