आमच्या हक्काचे पैसे परत द्या,गणेशला अडचणी देऊ नका : सुधीर लहारे
वाकडी - गणेश कारखाना रोलर पूजन उत्साहात संपन्न झाले.यावेळी आमदार विवेक कोल्हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले साखर उद्योग अडचणीत आहे त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची शिष्ठमंडळ घेऊन भेट घेणार आहोत.
गणेश कारखाना गाळप हंगाम आपल्याला सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करायचा आहेत.या पूर्वीचे हंगाम प्रतिकूल परिस्थितीत देखील आपण यशस्वी केले आहे.आधी आपण सत्ताधारी पक्षात होतो मात्र आता आपण सत्तेत देखील आहोत. यापुढे कुठल्या अडचणी येणार नाही आणि आल्या तरी त्या सोडवण्याची आणि अडचणींना जशास तसे उत्तर देण्याची तयारी आपण ठेवू.कर्मचाऱ्यांचे प्रश्न बहुतांशी सोडवले उर्वरित देखील येणाऱ्या काळात सोडण्यात येतील.
राजकीय व मानवनिर्मित अडचणीतून श्री गणेश कारखाना अतिशय संघर्षातून आपण पुढे नेतो आहोत.यावेळी आपण 3.5 लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे.तांत्रिक अडचणीमुळे मागील काळात झालेल्या त्रुटी दूर करणार आहोत.गणेशच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखाने घेऊन जातात याचा फटका यापूर्वी बसला आहे त्यावर आपण उपाययोजना करणार आहोत.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखान्याला आर्थिक अडचणीतून मदत करण्याचा प्रयत्न झाला यापुढे आगामी काळात जिल्हा बँकेवर समविचारी मंडळी येईल आणि बिनविरोध होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे.त्यामुळे गणेश कारखान्याला देखील यामुळे मदतच होणार आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून सभासदांनी दिलेला निकाल मान्य करायचा असतो मात्र निकालाच्या दिवशीच रेकॉर्ड पळवा पळवी येथे झाली होती. 17 कोटीचे आम्हाला घेणे आहे अशी नोटीस आपल्या संचालक मंडळाला देण्यात आली होती. त्यानंतर थेट 81 कोटी घेणे आहे असा लवाद टाकला गेला. त्या लवादात आपण आपलेच 28 कोटीपेक्षा अधिक रक्कम त्यांच्याकडून घेणे निघते. मात्र त्यावर पुढे काहीही झाले नाही.आपण न्यायालयात लढाई लढतो आहे.यासह जिल्हा बँकेतील देखील कर्जासाठी अडचणी विरोधकांनी आणल्या.सुप्रीम कोर्ट पर्यंत आपल्या विरोधात लढाई विरोधकांनी सुरू ठेवली आहे.
आम्ही निवडणूक लढवणार नाही असे कुणी म्हणत असतील तरी त्यांच्या मनात एक आणि करतील एक त्यामुळे गाफील आपण राहणार नाही. गणेश कसा बंद पडेल व तेथील नागरिकांना नंतर उपकाराची भाषा करून तुमचा ऊस आम्ही घेऊन जातो असे भासवण्याचा हा प्रयत्न वाटतो आहे.
राहुरी कारखान्याची कुठलीही मागणी नसताना त्यांना पाच कोटी गणेशचे देण्यात आले ते आता आठ कोटीहून अधिक झाले आहे.गणेश कारखाना आठ वर्ष प्रवराने चालवला,करार संपल्यानंतर देखील एक वर्ष त्यांच्या विचाराच्या संचालकांनी चालवला.सुजय विखे हे या संस्थेचे सभासद नाही तरीही त्यांच्या संचालक मंडळांनी त्यांना सह्यांचा अधिकार दिला त्याचा गैरवापर होऊन पाच कोटी रुपये राहुरी कारखान्याला गणेशचे देण्यात आले. यासह मोठे मन दाखवत गणेशच्या हक्काचे सभासदांचे 38 कोटी परत करावे असे आवाहन केले.
गणेश कारखाना रोलर पूजनाला मी स्वतः बसलो कारण जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आपण ठेवली आहे ती जबाबदारी झटकणार नाही.तुमचे जसे सभासदांचे पैसे तुम्हाला वाटत आहे तसे आमच्याही गणेशच्या सभासदांचे 38 कोटी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही.
चेअरमन सुधीर लहारे म्हणाले आम्हाला न्यायालयात त्रास देण्यापेक्षा आमचे हक्काचे पैसे तुमच्याकडे आहे ते आपण देण्याचे मोठेपण दाखवा.केवळ विरोध करून काही साध्य होणार नाही.याच मतदारसंघातील हा कारखाना आहे तो बंद पडण्यासाठी नाही तर पुढे जाण्यासाठी मदत करावा मात्र ते करण्यासाठी विरोधक तयार नसता.आमचा ऊस कोणी पळवला हे आम्हाला ठाऊक आहे.जेव्हा गाळप होत नव्हते तेव्हा उलट आम्ही संजीवनीची मदत घेतली या उलट प्रवरा आणि कोळपेवाडी यांनी ऊस नेला हे सर्वांना ठाऊक आहे. बाळासाहेब थोरात आणि आ.विवेक कोल्हे हे आमच्या पाठीशी भक्कम उभे आहे त्यामुळे आम्ही पारदर्शक कारभार करतो आहे. गट ऑफिसला देखील त्रास देणे सुरू आहे, गणेशला ऊस कमी मिळावा यासाठी विरोधक प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचे मनोगत चेअरमन सुधीर लहारे यांनी व्यक्त करत विरोधकांचा समाचार घेतला व येणारा हंगाम यशस्वी करू असा विश्वास व्यक्त केला.माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांनी कायमच ही कामधेनु वाचण्यासाठी पुढाकार घेतला. सुसंस्कारित नेतृत्व कसे असावे हे आमदार विवेक कोल्हे यांच्याकडे बघून कळते असेही लहारे म्हणाले.
स्वामी सहजानंद भारती आश्रमाचे मठाधिपती प.पूज्य चैतन्यगिरीजी महाराज,चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजय दंडवते,श्री गणेशचे संचालक सर्व संचालक,संगमनेर कारखान्याचे कार्यकारी संचालक घुगरकर साहेब, एम.डी जी.बी शिंदे,अधिकारी, सभासद,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या