श्रीरामपूर :-शहरातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेला मुख्य आरोपी जयप्रकाश ऊर्फ 'सोन्या' अशोक बेग (वय ४१, रा. सरस्वती कॉलनी) याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ६ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी आवेज जुबेर शेख व त्याचा मित्र राजीक पठाण हे मोटारसायकलवरून जात असताना सोन्या बेगने कार आडवी लावून त्यांना अडवले. वाद घालत त्याने धारदार हत्याराने, तर त्याच्या साथीदारांनी लाकडी दांडके व लोखंडी रॉडने आवेजवर बेदम हल्ला केला. या हल्ल्यात आवेज गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लोणी येथील पीएमटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिलेल्या जबाबावरून ५ मार्च रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता
गुन्ह्यानंतर फरार झालेल्या सोन्या बेगचा पोलिसांनी सातत्याने शोध घेतला. शुक्रवारी तो श्रीरामपूरात आल्याची माहिती मिळताच तपास पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. सोन्या बेग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे करत आहेत.
0 टिप्पण्या