पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो , मुळा पाणलोटात संततधार सुरूच अखेर पिंपळगाव खांड लघू पाटबंधारे प्रकल्प भरला

 



 अकोले / झरेकाठी - अकोले तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने मुळा नदीवरील अंबित पाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले आहेत.
मुळा नदीवरील १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण तीन दिवसापूर्वी भरले, त्यानंतर शुक्रवारी ६०० दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले, या वर्षीच्या पावसाळ्यात अकोल्यातील हे दुसरे धरण भरले आहे. पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा आता राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे झेपावला आहे.मुळा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर टिकून असल्याने मुळेचा प्रवाह कालपासून वाढला, यामुळे पिंपळगाव खांड धरण भरले. धरणातील जलसाठा आता नागरिकांचे आकर्षण बनले आहे. 
या परिसरातील या अथांग जलाशयाचे निसर्ग सौंदर्य याकडे लोक आकर्षित होऊ लागले आहे. २६ टीएमसी साठवण क्षमतेचे मुळा धरणाकडे आता मुळा नदीपात्रातून आवक सुरू झाली आहे. दरम्यान मुळा पाणलोटात आज मात्र पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.
  अखेर पिंपळगाव खांड लघू पाटबंधारे प्रकल्प भरून पाणी मुळा धरणाकडे संध्याकाळी मुळा धरणात पाणी पोहचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या