घर पट्टी भरायला सांगितल्याने ग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी; अदखलपात्र गुन्हा


श्रीगोंदा प्रतिनिधी : - तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील ग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
    तक्रारीनुसार, ३ जुलै रोजी सकाळी ग्रामपंचायत पारगाव सुद्रीक येथील विशाल शांताराम पिल्ले रा पारगाव सुद्रीक
हे ग्रामपंचायत मध्ये येऊन नाहरकत दाखला मागत होते मात्र वसुलीची मोहीम चालू असल्याने बांधकाम नाहरकत दाखल देण्यासाठी घरपट्टी ची मागणी केली असता आरोपीने ग्रामसेवक यांना सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही वारंवार धमक्या मिळाल्याने स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचे तक्रारदाराने लेखी निवेदनात नमूद केले असून, पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
या प्रकरणी आरोपी विशाल शांताराम पिल्ले (रा. पारगाव सुद्रीक) याच्याविरुद्ध ग्रामसेवक साहेबराव घोरपडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 351(2) व 352 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. 
या आरोपांबाबत आरोपीची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या