वांबोरी येथे स्थानिक गुन्हे शाखेचा बिंगोवर छापा ; दोघेजण ताब्यात




राहुरी : प्रतिनिधीअहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने दि. ३० जून रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दोन ठिकाणी सुरु असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. यावेळी दोन जणांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले. 
        मिळालेल्या माहितीनुसार दि. ३० जून २०२६ रोजी दुपारच्या वेळी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी बस स्थानक समोरील गाळ्यामध्ये छापा टाकला. त्यावेळी पथकाला तेथे बिंगो जुगार सुर असल्याचे दिसून आले. पोलिस आल्याची चाहूल लागताच अनेक जण तेथून पसार झाले. त्यावेळी पोलिस पथकाने दोन जुगार अड्ड्यावर कारवाई करुन तेथून एलईडी टीव्ही व जुगार खेळण्यासाठी लागणाले इतर साहित्य असा एका ठिकाणाहून २० हजार ३९० रुपये व दुसऱ्या ठिकाणाहून ३६ हजार ७८० असा एकूण ५७ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच नागेश चिमाजी देवकर (वय ३०) व प्रमोद नामदेव चोथे, (वय ३३), दोघे रा. रा. वांबोरी ता. राहुरी, यांना ताब्यात घेतले. तर अतुल सुभाष कुसमूडे आणि भारत विलास शिंदे, दोघे रा. वांबोरी, हे दोघे पसार झाले आहेत. 
         पोलीस काॅन्स्टेबल भगवान थोरात यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून चार जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या