झरेकाठी - पारनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील अवैध वाळू उपशाने आता परिसीमा गाठली आहे. मुळा नदीचा पूर ओसरताच वाळू तस्करांनी चोरीसाठी एक नवी शक्कल लढवली. थेट जांबुत गावच्या स्मशानभूमीतून, वनविभागाच्या हद्दीत जेसीबी चालवून नदीकाठापर्यंत रस्ता तयार करण्यात आला.
स्थानिक सुज्ञ नागरिकांनी ही बाब वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन वनविभागाचे अधिकारी ताम्हाणे यांनी दिले आहे. सध्या 'राजकीय आका'च्या वरदहस्तामुळे या भागातील अवैध धंदेवाल्यांची मुजोरी प्रचंड वाढली आहे. आता प्रशासन या मुजोर तस्करांवर नेमकी काय आणि कधी कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या