रोडे अर्बन निधीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेशकोट्यवधींच्या ठेवींचा संशयित घोटाळा,चेअरमन,संचालक,व्यवस्थापकावर कारवाईचे निर्देश


श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील रोडे अर्बन निधी लिमिटेडच्या कथित ठेवीदार फसवणूक प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड घडली आहे. ठेवीदाराची फसवणूक, विश्वासघात आणि मोठी आर्थिक रक्कम परत न दिल्याच्या आरोपांची दखल घेत न्यायालयाने संबंधित संस्था, चेअरमन, संचालक, व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, निधी संस्थेच्या व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्रीगोंदा तालुका फसवणुकीचे केद्र बनतेय कि काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे तालुक्यात मागील वर्षी सीस पे मध्ये हजारो कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली त्यातून सावरण्याच्या आगोदर पुन्हा समर्थ क्रॉप मध्ये कोट्यावधी रुपयांना तालुक्याची लुट झाली त्यानंतर विश्वासाने ठेवलेल्या ठेवीवर म्हणजे काष्ठी येथील साईसेवा पतसंस्था व मल्टिस्टेस्ट मध्ये ठेवीदारांचे पैशे जवळपास बुडाले आहेत त्यानंतर आता रोडे अर्बन निधी लिमिटेड मध्ये सर्व सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर  याप्रकरणी तक्रारदार हनुमंत कोंडीबा दांगट रा काष्ठी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि रोडे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून लाखो रुपयांच्या मुदत ठेवी स्वीकारल्या. मात्र मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम आणि व्याज परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने अखेर न्यायालयाचे दार ठोठावावे लागल्याचे तक्रारीत नमूद आहे.तक्रारीनुसार, संबंधित पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली, काही काळानंतर कार्यालय बंद ठेवण्यात आले, तर मोबाईल फोनही बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ठेवीदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत श्रीगोंदा पोलिसांकडे धाव घेतली मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी कोणत्याही प्रकरची दखल घेतली नाही त्यानंतर तक्रादार न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे आणि तक्रारीची दखल घेत श्रीगोंदा पोलिसांना चेरमन संतोष विठ्ठलराव रोडे यांच्यासह संचालक अभिजित प्रकाश देशमुख,विठ्ठल बळवंत रोडे,आदिती अभिजित देशमुख,प्रवीण विठ्ठल रोडे,अमोल झुंबर रसाळ याच्यासह संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईनंतर आणखी अनेक ठेवीदार पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तालुक्याचे लक्ष तपासाकडे
न्यायालयाच्या आदेशानंतर आता श्रीगोंदा पोलिसांकडून नेमकी कोणती कलमे लावली जातात, किती जणांवर गुन्हा दाखल होतो आणि फसवणुकीची रक्कम किती आहे, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र रक्कम कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता नाकारत येत नाही 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या