कोरडगावात विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल, आरोपी फरार

 



कोरडगाव- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील खंडोबाची वाडी येथे एका विवाहित महिलेवर कथित अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे . या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अत्याचार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

कुरुक्षेत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की,   १५ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पीडित विवाहित महिला उसाच्या शेतात काम करत असताना संशयित आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करून कथित अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर ही बाब कोणाला सांगितल्यास पीडित महिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने काही काळ ह प्रकार गुप्त ठेवला. मात्र, नंतर तिने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्या समवेत पाथर्डी पोलिस ठाणे गाठून अधिकृत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अत्याचार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी महिला संघटना व नागरिकांकडून करण्यात येत आहे.या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर व जलद कारवाईची गरज व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या