राहुरी :- तालुक्यात व परिसरात काल रात्री पासून पावसाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्यामुळे या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. संततधार पावसामुळे मुळा धरणात नवीन पाण्याची नव्याने आवक सुरू झाली असून, काल सायंकाळी सहा वाजता कोतुळकडून मुळा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सुमारे १८,७२४ क्युसेसने सुरु होती. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास आवक अजून वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे कोतुळकडुन मुळा नदीतून धरणाकडे नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या मुळा धरणात सुमारे २५ टक्के एकूण पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त साठा केवळ ९ टक्के आहे. मात्र नव्याने पाण्याची आवक सुरू झाल्याने नगर शहरासह राहुरी, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत मुळा धरणाची पातळी अतिशय खालावली होती. धरणाने तळगाठल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुद्धा चिंता निर्माण झाली होती. परंतु निसर्गाने साथ दिल्यामुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची चिंता कमी झाली आहे.

0 टिप्पण्या