माहितगार' व्यक्तीवर पोलिसांचा संशय!
श्रीरामपूर - राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील मंडल व तलाठी कार्यालय बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ३५ हजार रुपयांची सरकारी रोकड चोरून नेली. बुधवारी सकाळी कामगार तलाठी देशमुख कार्यालयात आले असता हा प्रकार उघडकीस आला.
या चोरीत दोन अत्यंत धक्कादायक आणि लक्षवेधी गोष्टी समोर आल्या आहेत. चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासह तब्बल तीन कुलुपे कोणत्याही छेडछाडीविना, थेट अचूक चाव्यांचा वापर करून उघडली. मात्र, तलाठी केबिनचे कुलूप त्यांना तोडावे लागले. केबिनमधील ड्रॉवरमध्ये खातेदारांकडून गोळा झालेला ३५ हजारांचा सरकारी भरणा ठेवला होता, तो चोरट्यांनी लंपास केला. धक्कादायक म्हणजे, चोरी केल्यानंतर चोरट्यांनी जाताना ती तिन्ही कुलुपे पुन्हा व्यवस्थित लावून घेतली.
कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. कुलुपांच्या चाव्या असणे आणि जाताना कुलुपे परत लावणे, यावरून या चोरीत एखाद्या माहितगार व्यक्तीचाच हात असावा, असा संशय लोणी पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहेत.
.jpg)
0 टिप्पण्या