आनंदवाडी,कौठ्यात बनावट डॉक्टर जेरबंद; श्रीगोंदा तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?



श्रीगोंदा प्रतिनिधी  ;- श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी,कौठा येथे बनावट डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती अनेकदा तालुका आरोग्य अधिकारी याना देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे तालुक्यातील काही सजग नागरिकांनी याबाबत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी याना माहिती दिल्यावर मजबुरीने श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी यांनी  कौठा आणि आनंदवाडी येथील दोन बोगस डॉक्टर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी दोन्ही बोगस डॉक्टरांना जेरबंद केले आहे  
   अनेकदा श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी,कौठा परिसरातील नागरिकांनी याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे बनावट डॉक्टर असल्याबाबत तक्रारी केल्या तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे नागरीकरणी याबाबत जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी बाबासाहेब नागरगोजे यांच्याकडे मोबाईलवरून तक्रारी केल्यावर तालुक्यातील कौठा आणि आनंदवाडी येथील बोगस डॉक्टराविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील काही वर्षापुरवी अश्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कथित बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. पुन्हा एकदा कौठा आणि आनंदवाडी अश्या दोन गावात कारवाई झाली,पण इतर गावांतील अशाच प्रकारच्या दवाखान्यांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर तालुका आरोग्य अधिकारी शैला डांगे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.त्यानुसार पश्चिम बंगाल (कोलकाता) येथील सौरभ गोरंग अधिकारी (कौठा) तसेच प्रबीर अरुण पाठक (आनंदवाडी) या ठिकाणी बोगस डॉक्टरकी करत होते या दोन व्यक्तीकडे आवश्यक वैद्यकीय पदवी, नोंदणी आणि कायदेशीर परवानगी नसताना रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप असून, त्यातील एका डॉक्टरांचे शिक्षण फक्त १० वि पास असल्याचे समजते तर दुसरा शहरातील एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम केल्यावर अनुभवाने डॉक्टरकी करत होता त्याचेवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, १९६१ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सलाईन, स्टेटॉस्कॉप इंजेक्शन तसेच विविध प्रकारच्या मेडिसिन मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत   पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर करीत आहेत.दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाहेरच्या राज्यांतून आलेले कथित बोगस डॉक्टर सर्रास उपचार करत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा तक्रारी करूनही आरोग्य विभागाकडून प्रभावी कारवाई होत नाही.परिसरातील अनेक तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार, बोगस डॉक्टर बाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता "काष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मुळे कारवाई करतील," असे सांगण्यात आले. मात्र, डॉ. मुळे यांनी "मला याबाबत कोणताही फोन आलेला नाही," असे सांगितल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे आरोग्य विभागाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याहून गंभीर बाब म्हणजे, काही नागरिकांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. या आरोपांना अद्याप कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नसून संबंधित अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरणही अद्याप प्राप्त झालेले नाही.तालुक्यातील आनंदवाडी कौठ्यातील कारवाई ही केवळ सुरुवात ठरणार की संपूर्ण तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरोधात व्यापक मोहीम राबवली जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि आरोग्य यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.
बोगस डॉक्टरांना मेडिसिन देणाऱ्या मेडिकलवर कारवाई कधी ?
श्रीगोंदा तालुक्यातील विविध ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला असून यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना तालुक्यातील कोणता मेडिकलवाला यांना  उपचारासाठी मेडिसिन अथवा उपचारासाठी लागणारे साहित्य देत होता असे साहित्य आणि औषधे देणाऱ्या मेडिकलवाल्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे 
मॅडम म्हणतात लेखी तक्रार नाही ?
श्रीगोंदा तालुक्यातील विविध भागात बोगस डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत असताना तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्याला याबाबत काहीच माहित नाही मग तालुक्यातील गावोगावी पसरलेले आरोग्य यंत्रणेचे जाळे किती कुचकामी आहे याचा यातूनच प्रत्यय येतो मात्र नागरिकांनी अनेकदा त्यांना फोन करून याबाबत माहिती दिली तरीही तालुका आरोग्य अधिकारी म्हणतात आमच्याकडे एकही लेखी तक्रार प्राप्त नाही मग एखादी मोठी घटना होण्याची आरोग्य विभाग वाट पाहतोय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे 
नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही - बाबासाहेब नागरगोजे (जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद )
श्रीगोंदा तालुक्यात बनावट डॉक्टर आढळले हि अतिशय गंभीर बाब असून नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? खरं तर ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरु आहे त्यांनीच प्रशासनाला माहिती दिली पाहिजे पण दिली जात नाही हि खेदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी  बापूसाहेब नागरगोजे यांनी बोलताना दिली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या