श्रीगोंदा | प्रतिनिधी- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात एका महिलेच्या फिर्यादीवरून जमीन वादातून अनुसूचित जातीतील कुटुंबाला शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि जातीवाचक अपमान केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, फिर्यादी मनीषा अंकुश काळे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 22 मे 2026 रोजी सकाळी 7 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान बेलवंडी हद्दीतील विचवली ताशीव मळा परिसरात ही घटना घडल्याचा आरोप आहे.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, जमिनीच्या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले, जीवे मारण्याची धमकी दिली तसेच अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीने आरोपींनी कपडे फाडण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही उल्लेख केला आहे.या प्रकरणी जाहीर जमशेद शेख, महादेव मुकुंद झेंडे, प्रविण प्रकाश शिंदे, पांडुरंग भास्कर गाडेकर आणि संतोष संपत झेंडे (सर्व रा. चिखली ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 352, 351(2), 351(3), बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा कलम 8 व 12 तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम 3(1)(w)(ii), 3(1)(r) आणि 3(1)(s) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार कुमार क्षीरसागर करीत आहेत.
.jpg)
0 टिप्पण्या