अज्ञात वाहनाच्या धडकेत ८३ वर्षीय वारकऱ्याचा मृत्यू


 

 


सोनई - नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई परिसरात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत हिंगोली ८३ वर्षीय वृद्ध वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर येथील राऊतबाबा यांच्या दिंडीत असलेले वारकरी दत्तराव गंगाराम जाधव (वय ८३, रा. इडोली, ता. जि. हिंगोली) हे ११ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास शिंगवे तुकाई येथील वैभव दत्त मंगल कार्यालयाजवळील एमआयडीसी चौकातून अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. 

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना नेवासा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी मृताचे पुत्र ज्ञानेश्वर दत्तात्रय जाधव ( व्यवसाय शेती, रा. इडोली, ता. जि. हिंगोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४(अ)(ब) व १८४/१७७ अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार ए. एस. तमनर हे करीत असून, वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू आहे.

==================

चौकट -गंगापूर येथील दिंडीतील वारकरी दत्तराव जाधव रा. हिंगोली यांचा अपघात झाला.यावेळी नेवासाचे आ.विठ्ठलराव लंघे यांनी शवविच्छेना साठी मदत करून घरी पोहच केले.त्यांचे मनापासून आभार.
-----ज्ञानेश्वर जाधव रा. इडोली जि. हिंगोली 

====================

चौकट -"हिंगोली येथील वारकरी दत्तराव जाधव शिंगवेतुकाई अपघातात मयत झाले त्यांच्या कुटुंबाप्रती सदभावना व्यक्त करतो.त्यांना वारकरी अपघात योजने मधून ४ लाख मदत देण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करू".

  आ. विठ्ठलराव लंघे  
नेवासा विधानसभा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या