एकाच रात्रीत बिबट्या जेरबंद; औरंगपूर परिसरातील नागरिकांना दिलासा




झरेकाठी | संगमनेर तालुक्यातील औरंगपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुधीर गोपाळ गुंजाळ यांच्या गट क्रमांक २९४ मधील शेत परिसरात एक बिबट्या, एक बिबटीण व दोन बछडे अशा चार बिबट्यांचा वावर असल्याने ग्रामस्थ, शेतकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडणेही टाळले होते.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे व ग्रामस्थांनी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील आणि वन विभागाकडे केली होती. त्यानुसार वन विभागाने शनिवारी पिंजरा उपलब्ध करून दिला. वन अधिकारी साळवे, पवार व डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी पिंजरा लावण्यात आला. विशेष म्हणजे अवघ्या एका रात्रीत एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.
मात्र परिसरात आणखी तीन बिबट्यांचा वावर असल्याने वन विभागाने शोधमोहीम सुरू ठेवली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या