विजेचा धक्का बसून मुलाचा मृत्यू





 शनिशिंगणापूर : सोनई येथील हलवाई गल्लीत बांधलेल्या लोखंडी पाहडात विजेचा प्रवाह उतरल्याने ईश्वर उर्फ गोल्या राहुल वैरागर (वय ७, रा. अंबिकानगर ) याला विजेचा धक्का बसून मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. 30 रोजी मंगळवारी घडली.


   या दुर्दैवी घटनेमुळे सोनई गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत असून वैरागर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 वैरागर कुटुंब अंबिकानगर येथे राहत असून हलवाई गल्लीत गेल्या काही दिवसापासून एका दुकानाचे डेकोरेटेड काम चालू असून त्यासाठी बांधण्यात आलेल्या लाकडी व लोखंडी सांगाडा मध्ये विजेचा प्रवाह आल्याने मुलाचा जागीच चिकटून मृत्यू झाला.हा प्रकार पाहता तातडीने कुटूंबीयांनी व नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र वैदिकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. मृत ईश्वर हा शाळेतून घरी आला होता.एका दुकानात खाऊसाठी आला होता, तेथे दुर्दैवी घटना घडली. अशा या पावसाळ्यात धोकादायक विजवाहिनी तपासणी करून दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या