साई भक्ताचे दिड लाखाचे सोने परत, सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा





शिर्डी : - जर्मनी येथील साईभक्त धनुष आपल्या कुटुंबासह शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता. मंदिर परिसरातील गुरुस्थान जवळ त्यांच्या जवळ असलेल्या पर्स मधील १० ग्रॅम वजनाचे बाळाचे सोन्याचे दागिने व व्हिसा ते विसरून गेले हे तेथील सफाई कर्मचारी उत्तम चाबुकस्वार यांनी इमानदारीने परत केले आहे.

सदर साई भक्तांकडे सोबत पाच महिन्याचं बाळ पण होते ते दर्शना नंतर मंदिर परिसरात  गुरुस्थान जवळ थांबले असत त्यांची पर्स विसरून गेले, त्यात १० ग्राम वजनाचे बाळाचे सोन्याचे दागिने (किंमत १५०,०००) व व्हिसा होता. त्यांची पर्स हरवल्याची लक्षात आल्याने त्यांचा गोंधळ उडाला कारण व्हीसा शिवाय त्यांना जर्मनीला जाणे शक्य नव्हते. त्यांनी शोधा शोध सुरू केली परंतू त्यांना ती पर्स मिळून आली नाही .त्यानंतर संस्थान चे आरोग्य विभागाचे कर्मचारी उत्तम चाबुकस्वार हे गुरुस्थान जवळ सफाई करण्यासाठी गेले असता त्यांना ते पाकीट सापडले. त्यांनी ते प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केले. त्यानंतर ओळख पटवून साईभक्तांना व्हिसा आणि दागिने परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या