रतनगडावर अश्लील कृत्याचा व्हिडिओ व्हायरल जोडप्याविरोधात गुन्हा


अकोले : -प्रसिद्ध पर्यटनस्थळ रतनगडावर अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर संबंधित गंभीर प्रकार समोर आला.

 अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि धार्मिक महत्त्व असलेल्या रतनगड परिसरात घडलेल्या एका प्रकारामुळे परिसरात तीव्र नाराजीच वातावरण निर्माण झाले आहे. रतनगड तसेच रतनबाई देवी मंदिर परिसरात एका जोडप्यानं अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहेत. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली जोडप्याविरोधात राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
 या प्रकरणी रतनवाडी येथील रहिवासी तथा विद्यमान उपसरपंच भरत चिंधू झाडे यांनी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दि. 18 जून 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास रतनवाडी येथील दक्षता व सनियंत्रण समितीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये एका महिला आणि तिच्या सहकाऱ्यानं रतनबाई देवी मंदिर परिसर तसेच रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याचं नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. रतनगड हे ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक श्रद्धेचं केंद्र असल्यानं अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त आणि सभ्यतेचं पालन करावं, असं आवाहनही करण्यात येत आहे
 या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात संबंधित जोडप्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्याविरोधात राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 205/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 29 जून रोजी रात्री या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नरोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सार्वजनिक तसेच धार्मिक स्थळांवर गैरवर्तन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या