मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणाला वेग; राहुरीत आढावा बैठक

बीएलओंच्या अनुपस्थितीवर मंत्री विखेंची नाराजी







 राहुरी  प्रतिनिधी- राहरी मतदारसंघातील मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण आढावा बैठक काल शनिवार दि. १८ जुलै रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा घेताना ५२ टक्के काम पूर्ण झाले असून अद्याप ४८ टक्के काम बाकी असल्याची माहिती प्रांताधिकारी किरण सावंत यांनी दिली. दुपार उशीरा पर्यंत बैठक सुरू होती.

या बैठकीत बीएलओंच्या  वैधनामा मतदार संघस्तरीय  बैठक अनुपस्थितीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे  यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला खडसावले. बीएलओ जर घरोघरी जाऊन मतदारांची माहिती देत नसतील, फॉर्म भरत नसतील, तर संबंधित नागरिकांचे नाव मतदार यादीत राहणार‌ नाही. ही गंभीर बाब असून बीएलओंनी जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
बैठकीला आ. प्राजक्त तनपुरे, आ. अक्षय कर्डिले, जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, विनायक देशमुख, शामराव निमसे, उदयसिंह पाटील, दादा पाटील सोनवणे, अँड. तान्हाजी धसाळ, सुकुमार पवार, मोहन पालवे, मुळा धरण अभियंता सायली पाटील, सुरसिंग पवार, सुभाष गायकवाड, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार अमित पवार यांसह विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
    तसेच कार्यक्रमस्थळी सुरेश बानकर, आर.आर. तनपुरे, राजेंद्र उंडे, अमोल भनगडे, ज्ञानेश्वर बाचकर, सुरेश भुजाडी अनिल कासार, विराज धसाळ, बाळासाहेब उंडे, बबन गुलदगड, नंदकुमार डोळस, सुरेश निमसे, रामदास बाचकर, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या