भंडारदऱ्यात पावसाचे पुनरागमन; बळीराजा सुखावला, पर्यटकांची लगबग

 


​भंडारदरा- पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात अखेर मान्सूनचे जोरदार पुनरागमन झाले आहे. घाटघर, पांजरेसह संपूर्ण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे निसर्ग हिरवाईने न्हाऊन निघाला आहे. पावसामुळे भात लागवडीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी चिखलात उतरून लगबगीने भात लावणीला सुरुवात केली आहे. बळीराजासाठी हा पाऊस नवसंजीवनी ठरला असून, बहरलेल्या निसर्गामुळे पर्यटकांचीही गर्दी वाढली आहे. डोंगरदऱ्यांतील धबधबे सक्रिय झाल्याने आणि धुक्यात हरवलेले कळसूबाई शिखर पर्यटकांना भुरळ घालत आहे. सध्या भंडारदरा धरण ६२ टक्के भरले असून, या पावसामुळे शेती आणि पर्यटन क्षेत्राला उभारी मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या