पारनेर प्रतिनिधी : - शासनाच्या कारभारामधे पारदर्शकता आणण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी माहिती अधिकार हा क्रांतिकारी कायदा जनतेला मिळवून दिला, परंतु त्याच माहिती अधिकार कायद्यात दुरुस्त्या केल्या जात आहेत. त्याविरोधात राज्यभरामधे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा लोकआंदोलन न्यासच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी दिला आहें.माहिती अधिकार कायद्याच्या जनजागृती साठी लोकआंदोलन न्यासच्या वतीने महाराष्ट्र राज्यात दौरे केले जाणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते दत्ता आवारी यांनी सांगितले.
गडचिरोली येथे झालेल्या लोक आंदोलन न्यासच्या संघटना बांधणी सभेत इनामदार बोलत होत्या.गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती अशा विदर्भ दौऱ्याची सुरुवात शनिवारी (दि. २७) गडचिरोली येथून झाली.आंदोलनाचे विश्वस्त दिवंगत डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी राळेगणसिद्धीचे लोक आंदोलनाचे राष्ट्रीय खजिनदार दत्ता आवारी, विश्वस्त अन्सार शेख, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, डॉ.अनंता कुंभारे, चंद्रशेखर भडांगे, आदीसह लोक आंदोलन न्यासचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते. कायद्यातील बदला विरोधात ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे हे ५ जुलैपासून उपोषण करणार आहेत. यापूर्वी त्यांनी वेळोवेळी या कायद्या साठी २००२, २००३, २००६ मध्ये उपोषण केले. तेव्हा हा माहिती अधिकार कायदा करण्यात आला.म्हणून या कायद्यासाठी राज्यभर जनजागृती केली जात असून,यासाठीची जनहित याचिका न्यायालयात
दाखल करणार असल्याचे कल्पना इनामदार यांनी बोलताना सांगितले.

0 टिप्पण्या