पुणे :आयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील दानचोरीचा प्रकार खेडजनक व धक्कादायक आहे. भक्तांद्वारे जे दान दिले जाते व मोजले जाते त्याच्याशी आपला दुरान्वये संबंध नाही. आपण रमजान्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत असून न्यासाचे आजवरचे हिशोब चोख व सुरक्षित आहेत. कोषामधील जमाखर्चाचे नियमित लेखपरीक्षण केलेले आहे. सदर जमाखर्चाची अधिकृत व्यक्तीद्वारे पडताळणी केली जाऊ शकते. त्यामुळे राममंदिर दानचोरी प्रकरणी कसून चौकशी होऊन दोषी कितीही मोठा असला तरी त्यास कठोर शासन व्हावे अशी मागणी श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष श्री.गोविंददेवगिरी यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गोविंददेवगिरी यांनी म्हटले आहे की, राममंदिरात रामचरणी समर्पित दान आणि श्रीराम जन्मभूमी न्यास देणगीचा संबंध नाही. राम मंदिरातील दान आदीची मोजणी स्वतंत्र यंत्रणेद्वारे होते. तसेच व्यवहार बँकेद्वारा होतात ज्याचाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष असून आपण अत्यंत विश्वास व निष्ठेने हि जबाबदारी पार पाडीत आहोत. न्यासाला आजवर ज्या देणगी मिळाल्या व जे खर्च झाले त्याच्या जमाखर्चाचे नियमित लेखापरीक्षण झालेले आहे. आपण मंदिरासाठी चेक व्यतिरिक्त रोख किंवा वस्तू स्वरूपात भेट स्वीकारलेली नाही.त्यामुळे झालेल्या प्रकारांशी आपला काहीही संबंध नाही. झालेल्या घटनेची विशेष चौकशी समिती चौकशी करीत असून चौकशीअंती सत्य समोर येईलच असा निर्वाळा त्यांनी दिला.
. श्रीराम जन्मभूमी न्यासाचे विश्वस्त वा कोषध्यक्ष पदासाठी आपण कोणतेही प्रयास केले नाहीत. कोषाध्यक्ष म्हणून हिशोब चोख राखणे आपले कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पाडले आहे.आपण विमान प्रवास वा अन्य खर्च स्वतः केलेला आहे.त्यामुळे चोरीच्या घटनेची कसून चौकशी व्हावी आणि दोषी कितीही मोठा असला तरी त्यास शासन व्हावे अशी मागणी गोविंददेवगिरी यांनी केली आहे.

0 टिप्पण्या