घरात घुसून धुमाकूळ घालणारे आणि जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद!

 


श्रीरामपूर घरात बेकायदेशीरपणे घुसून तोडफोड करणे, फिर्यादीला बेदम मारहाण करून रोख रक्कम लुटणे आणि वाहनाची नासधूस करणाऱ्या दोन सराईत आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंद्र धन्नकुमार कटारिया (रा.नांदूर) यांच्या राहत्या घरी (दि.१०) जुलै रोजी रात्रीच्या सुमारास हा थरार घडला. हातात लोखंडी टॉमी, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेतलेल्या चार अनोळखी इसमांनी कटारिया यांच्या घरावर हल्ला चढवला.आरोपींनी सुरुवातीला घराबाहेर उभी असलेली स्कार्पिओ कार (क्र. एमएच १७ सी एक्स 8399 च्या बोनेटवर प्रहार करून गाडीचे मोठे नुकसान केले, त्यानंतर आरोपींनी घरात बळजबरीने प्रवेश केला. खिडक्यांच्या काचा फोडून नुकसान केले आणि फिर्यादी देवेंद्र कटारिया यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कटारिया यांच्याजवळील २५,००० रुपये रोख बळजबरीने काढून घेतले आणि तिथून पोबारा केला.

​याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ६८८/२०२६ नुसार, बी.एन.एस. कलम ११९(१), ३३३, ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत गुन्हा दाखल होताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि तपासाचे चक्र फिरवून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या असता 

​तपास पथक आरोपींचा शोध घेत असतानाच, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपी एम.आय.डी.सी. श्रीरामपूर परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तात्काळ एम.आय.डी.सी. परिसरात धाव घेतली.

पोलिसांना पाहताच दोन संशयित इसम पळून जाऊ लागले. मात्र, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश उर्फ अक्षय सुरेश हुसळे (वय २७, रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर),आकाश संजय पवार (वय २१, रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर) अटक करण्यात आली.दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.​ही धडक कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल चंद्रकांत खैरे व त्यांच्या विशेष तपास पथकातील अंमलदारांनी केली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर औताडे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या