मठाचीवाडीत धाडसी घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास.




शेवगाव प्रतिनिधी -: तालुक्यातील मठाचीवाडी येथे अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 30) पहाटे उघडकीस आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मठाचीवाडी येथील संदिप एकनाथ ठोंबळ (वय 35, व्यवसाय – शेती) हे सोमवारी दिवसभर शेतातील काम करून सायंकाळी घरी आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर उकाडा असल्याने ते घराबाहेरील ओट्यावर झोपले होते, तर घरामध्ये त्यांची आई, पत्नी व मुले झोपलेली होती. उष्णतेमुळे घराचा दरवाजा अर्धवट लोटलेला होता.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुलगी पायल हिला जाग आल्यानंतर घरातील लोखंडी कपाट उघडे असल्याचे दिसून आले. तिने वडिलांना उठविल्यानंतर कपाटातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. कपाटाची चावी दिवाणावरील गादीवर पडलेली होती. तपासणी केली असता कपाटातील सध्या बाजार मूल्याप्रमाणे सुमारे किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (साखळीसह सोन्याचे पदक असलेले) , सात ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र, दोन कानातील वेल, सोन्याची अंगठी, सोन्याचे डोरले असे अठरा ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत सात लाख पंचान्नव हजार  व रोख रक्कम दीड लाख रुपयेचोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तसेच पॅन्टच्या खिशात ठेवलेली रोख रक्कमही अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळले.
या प्रकरणी संदिप ठोंबळ यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव  बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम नाकाडे हे करीत आहेतकरीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या