'सत्यमेव जयते ग्रुप' च्या अथक प्रयत्नांना यश
बेलापूर :श्रीरामपूर-बेलापू र रस्त्याच्या दुभाजकात सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेली झाडे पाण्याभावी जळायला लागली होती.बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुपने ग्रामपंचायत तसेच विविध संघटना व वृक्षप्रेमी व्यक्तींच्या सहकार्यातून सदर झाडांना वेळोवेळी पाणी देण्याची व्यवस्था करून सदर झाडांना जीवदान दिले..
. श्रीरामपूर -बेलापूर रस्ता माजी आ. लहू कानडे यांच्या प्रयत्नातून चौपदरी करण्यात आला. या रस्त्याच्या दुभाजकात सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारामार्फत झाडे लावली. मात्र निधी नसल्याची सबब सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाने या झाडाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले. हिच अवस्था रस्त्याच्या दतर्फा लावलेल्या झाडाची आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने मागणी करूनही झाडांना पाणी देण्याची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी नसल्याची सबब सांगत केली नाही.
. बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुपने यासंदर्भात पुढाकार घेतला. काही संस्था तसेच वृक्षप्रेमी व्यक्तीकडून वर्गणी जमा केली. जमलेल्या वर्गणीतून ग्रामपंचायतकडे रीतसर टँकरभाडे जमा करून झाडांना वेळोवेळी पाणी देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे कडक्याच्या उन्हातही झाडे तग धरून राहिली व जळून चाललेल्या झाडांना जीवदान मिळाले.
. सत्यमेव जयते ग्रुपच्या प्रयत्नावर काहीजणांनी कोणतीही माहिती न घेता टीका केली. अशा टिकाकारांनी झाडे जळत असताना ते वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले ते ग्रामस्थांना सांगावे. तसेच निधी उपलब्ध नव्हता तर झाडे लावली कशाला याचा जाब सार्वजनिक बांधकाम विभागास विचारावा आणि देखभालीसाठी सत्यमेव जयते ग्रुपने वर्गणीतून केलेला खर्च संबधीत ठेकेदाराकडून वसूल करून ती रक्कम ग्रामपंचायतमध्ये जमा करण्याची तसदी घ्यावी असे आवाहन सत्यमेव जयते ग्रुपने केली आहे.

0 टिप्पण्या