श्रीरामपूरात दुचाकी चोरणारा कॅमेऱ्यात कैद




श्रीरामपूर : शहरातील रा.साई मंदिराजवळ,सुभाष कॉलनी येथे घरासमोर लावलेली पेंशन प्लस मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.मात्र हा मोटारसायकल चोरणारा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. शहरातील सुभाष कॉलनीतील साई मंदिराशेजारी राहणारे जावेद सय्यद यांनी त्यांची १० हजार रूपये किंमतीची पॅशन दुचाकी क्र.एमएच-के२७८६ ही मोटारसायकल त्यांच्या घरासमोर लावलेली होती. रात्रीतून अज्ञात चोराने ही मोटारसायकल चोरून नेल्याची बाब सकाळी लक्षात आली. तेव्हा तेथे लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक इसम मोटारसायकल चोरून नेत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जावेद सय्यद यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या