राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील ग्राम विकास अधिकारी सह तिघे एसीबीच्या जाळ्यात
सोमनाथ डोळे / झरेकाठी प्रतिनिधी :
झरेकाठी प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या पुढील अनुदानासाठी हप्ता मंजूर करून देण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना सात्रळ ग्रामपंचायत येथील कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने( एसीबी) रंगेहाथ पकडले . या प्रकरणात ग्राम विकास अधिकारी आणि कंत्राटी अभियंताला ही आरोपी करण्यात आले असून,तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीच्या माहितीनुसार,सात्रळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हैदर याकुब पटेल ५६वय.कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे वय (४३) आणि कंत्राटी अभियंता सचिन हौशीराम ब्राह्मणे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८च्या कलम ७ व १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे .
तक्राराला सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते .पहिला हप्ता पंधरा हजार रुपयाचा आणि दुसरा ७० हजार रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित अनुदानाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयाची लाच मागण्यात आल्याची तक्रार एसीबी कडे करण्यात आली होती .
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता ग्राम विकास अधिकारी पटेल व कंत्राटी लिपिक डुकरे यांनी लाचेची मागणी केल्याची स्पष्ट झाले .
त्यानंतर मंगळवारी रचलेल्या सापळ्यात कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयाची लाच स्वीकारतानाच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
ह्या व्यवहारासाठी कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणी यांनी डुकरे यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप एसीबीने केला आहे .
पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट व पथकाने सापळा यशस्वी केला .पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत .
दरम्यान शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपतप्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आव्हान एसीबीने केले आहे.
0 टिप्पण्या