वडोदरा(प्रतिनिधी :- योगेश कडसकर ) : सहकार क्षेत्राला आधुनिक, सुरक्षित आणि विश्वासार्ह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पीओसिट सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लि., पुणे या कंपनीचा बडोदा डिस्ट्रिक्ट को-ऑप. क्रेडिट सोसायटीज फेडरेशन लिमिटेड, वडोदरा यांच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.
फेडरेशनच्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीच्या निमित्ताने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी वडोदरा येथील हॉटेल तारा सन्स, यश कॉम्प्लेक्स, क्रॉस रोड, गोत्री येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पीओसिट सॉफ्टवेअर सोल्युशन्सला उत्कृष्ट सेवा व सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी पीओसिट सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे फाउंडर व सी.एम.ओ. श्री. श्रीकांतजी मुळे तसेच मार्केटिंग टीम मॅनेजर श्री. अमोलजी पाटील यांनी कंपनीच्या वतीने हा सन्मान स्वीकारला.
या कार्यक्रमाला गुजरात सरकारचे सहकार राज्यमंत्री मा. जितुभाई वाघाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वडोदरा महानगरपालिकेच्या महापौर सौ. गीताबेन मकवाणा, दारभवती (डभोई)चे आमदार श्री. शैलेशभाई के. मेहता (सोट्टा), गुजरात स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीज फेडरेशनचे चेअरमन श्री. घनश्यामभाई अमीन, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीज फेडरेशनचे चेअरमन श्री. दीपक पाटवर्धन आणि वेस्ट बंगाल को-ऑप. क्रेडिट सोसायटीज फेडरेशनचे चेअरमन श्री. सत्यव्रत सामंता यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या Guest of Honour म्हणून कर्नाटक स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीज फेडरेशनचे डायरेक्टर डॉ. संजय होस्मत, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीज फेडरेशनचे डायरेक्टर श्री. वासुदेव काळे, वेस्ट बंगाल स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीज फेडरेशनचे व्हाइस चेअरमन श्री. अरुप बोराल आणि सेक्रेटरी श्री. प्रताप पारिया उपस्थित होते.
तसेच बडोदा डेअरीचे चेअरमन श्री. दिनेशभाई बी. पटेल (दिनू मामा), बडोदा सेंट्रल को-ऑप. बँक, वडोदरा चे चेअरमन श्री. राजुभाई पटेल आणि कन्झ्युमर राइट्स ऑर्गनायझेशनचे को-फाउंडर श्री. नवीनप्रकाश शर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे Event Chairman श्री. प्रवीणभाई पटेल (प्रेसिडेंट – जिल्हा सहकारी संघ, वडोदरा) होते. कार्यक्रमास फेडरेशनचे चेअरमन श्री. आर. एम. पटेल, सेक्रेटरी श्री. गोविंद दहिवळकर तसेच फेडरेशनच्या संपूर्ण टीमची उपस्थिती होती.
सहकारी संस्था आणि पतसंस्थांच्या डिजिटल व्यवस्थापनाला अधिक सक्षम, सुरक्षित आणि कार्यक्षम बनविण्यासाठी पीओसिट सॉफ्टवेअर सोल्युशन्सकडून सातत्याने तंत्रज्ञानाधारित सेवा दिल्या जात आहेत. सहकार क्षेत्रातील संस्थांना आधुनिक डिजिटल प्रणाली उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान पीओसिटच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीवर उमटलेली कौतुकाची मोहोर मानली जात आहे.
या गौरवामुळे पीओसिट सॉफ्टवेअर सोल्युशन्सच्या संपूर्ण टीममध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही सहकार क्षेत्राला अधिक प्रभावी, सुरक्षित आणि आधुनिक डिजिटल सेवा देण्याचा कंपनीचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
0 टिप्पण्या