लोणी कुरकुटे वस्ती शिवारातील शृंखला हॉस्टेलच्या मागील बाजूस आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रविंद्र रावसाहेब शिंदे, वय २७ वर्षे, हे लक्ष्मण मारुती कुरकुटे यांच्या शेतजमिनीत पाणी भरत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली.विशेष म्हणजे, हल्ल्याच्या वेळी रविंद्र शिंदे यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.या हल्ल्यात रविंद्र शिंदे जखमी झाले असून जवळपास 10 ते 15 मिनिटे बिबट्याशी झुंज दिली , त्यांना उपचारासाठी प्रथम प्रवरा हॉस्पिटल येथे व नंतर लोणी येथे सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले व नंतर अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या परिसरात मादी बिबट्या आपल्या काही पिलांसह फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.शेतामध्ये काम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच बिबट्या किंवा त्याची पिले दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.या घटनेनंतर वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के, लोणी ग्रामपंचायत सदस्य प्रविण विखे, संदीप गोसावी घटना स्थळी पोहचले व मदत कार्य सुरु केले लोणी कुरकुटे वस्ती शिवारात बिबट्याची दहशत कायम… शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!प्रतिनिधी शंकर सोनवणे प्रवरानगर
लोणी कुरकुटे वस्ती शिवारात बिबट्याचा तरुणावर हल्ला!
लोणी :-(प्रतिनिधी :- शंकर सोनवणे )
0 टिप्पण्या