सिस्पे इन्फिनिटी, बिकन ग्लोबल ट्रेडिंग, समर्थ क्रॉप केअरनंतर आता युनीड्स गोल्डच्या परताव्याचा प्रश्न गुंतवणूकदारांमध्ये संताप, संभ्रम आणि प्रतीक्षेची कोंडी
श्रीगोंदा / दादा सोनवणे
: श्रीगोंदा तालुक्यात विविध गुंतवणूक व परतावा योजनांबाबत यापूर्वी सिस्पे इन्फिनिटी, बिकन ग्लोबल ट्रेडिंग आणि समर्थ क्रॉप केअर यांसारख्या अनेक संस्थांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चर्चेनंतर आता आढळगाव येथील युनीड्स गोल्ड कंपनीच्या परताव्याचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कंपनीशी संबंधित दीपक गोरे हे अनेक दिवसांपासून नॉट रीचेबल असल्याने गुंतवणूकदार बेहाल झाले आहेत मान्य केले आहे.
श्रीगोंदा तालुकासह पारनेर तालुक्यात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा आणि दरमहा ८ ते १० टक्के परतावा मिळावा अश्या प्रकारे सिस- पे नावाची कंपनी उदयास आली त्यानंतर कंपनीची वेगवेगळी नावे उदयास आली त्यामध्ये सिस पे, इन्फिनिटी बिकन, जस्ट येएमसी ग्लोबल ट्रेडिंग कंपनी अश्या विविध नावाने कंपनीची नावे बदलत गेली त्यामध्ये हजारो कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती त्यानंतर युनीड्स गोल्ड कंपनीचीही अशीच अवस्था झाली असून त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेकांनी आपली वडिलोपार्जित शेतजमीन विकली तर अनेकांनी बँकेत,सोसायटीत कर्ज घेऊन गुंतवणूक केली तास कोणी दागदागिने मोडून, तर कोणी व्याजाने घेऊन गुंतवणूक केली काहींनी नोकरीवर कर्ज काढून गुंतवणूक केली त्यातून काह लोकांना परतावे पण मिळाले एजंट मोठ्या प्रमाणात मालामाल झाले मात्र अनेकांची फसवणूक पण झाली आहे आत कंपनीचालक पसार झाले आहेत इतर कंपन्यांप्रमाणे युनिक गोल्ड कंपनीकडून काही लोकांना शोषलं मीडियावर तारीख पे तारीख दिली जात आहे त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा बेहाल झाले आहेत सिस पे,इन्फिनिटी, बिकन ग्लोबल ट्रेडिंग आणि समर्थ क्रॉप केअर यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिवसेंदिवस तक्रादार वाढतच चालले आहेत तरीसुद्धा अनेक गुंतवणूकदार पोलीस ठाण्यात चकरा मारताना दिसत आहेत मात्र यावर कोणत्याही प्रकारचा ठोस उपाय होत नसल्यामुळे या मुद्द्यावर श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी केली असून गुंतवणूकदार यांनी फसवणूक झाल्याचे सरकाराच्या निदर्शनास आणून दिले असून यावर सरकारी यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली आहे त्यामुळे गुंतवणूकदार यांच्या आश्या पल्लवित झाल्या असून लोकांना पैशे परत मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच दिलासा मिळेल असेही बोलले जात आहे हा प्रकार सावरतोय तोच पुन्हा युनीड्स गोल्ड कंपनी त्याच मार्गावर आलेली दिलेत आहे त्यामुळे त्याच्यावाही लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लालच बरी बला याप्रमाणे अनेकजण याचे बळी ठरले आहेत
कंपनी संस्थापक यास्नी “आज मी नमस्कार म्हणण्याच्या पण लायकीचा नाही राहिलो... तुम्ही माझं ऐकत आलात आणि माझ्याकडून कायम तुम्हाला निराशाच हाती आली,” अशा आशयाने त्यांनी यापूर्वीचे वायदे पूर्ण करू शकलो नसल्याचे मान्य केले आहे.मात्र, त्याचवेळी त्यांनी आपण अद्याप हार मानलेली नसल्याचे सांगत “शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचविणे हेच माझे ध्येय असेल,” असा दावा केला आहे.यामुळे एका बाजूला विश्वास गमावल्याची कबुली, तर दुसऱ्या बाजूला पैसे परत करण्याचा निर्धारया दोन भूमिकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
इकडे गोल्ड नाही तर जनताच क्लीन बोल्डआतापर्यँतच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा आणि भरघोष परतावा मिळावा असे आमिष दाखवण्यात आले मात्र युनीड्स गोल्ड कंपनीकडे आजच्या भावात सोने बुक करायचे ती रक्कम २४ हप्त्यात जमा करायची म्हणजे तेजीचा फायदा होऊन कमी पैशात गोल्ड देऊ असे सांगण्यात आले मात्र इकडे गोल्ड तर नाही मिळाले पण जनतेचा खिसा एकदम क्लीन बोल्ड झाला आहे असे अनेक गुंतवणूकदार बोलत आहेत
0 टिप्पण्या