संगमनेरमध्ये दिल्ली नाका परिसरात भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू

 


संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात आज भीषण अपघात झाला. संगमनेरच्या दिशेने येत असताना एका भरधाव कंटेनरने टीव्हीएस दुचाकीवरून जाणाऱ्या सुमिया मतीन तांबोळी या महिलेला जोराची धडक दिली.

धडकेनंतर त्या कंटेनर खाली आल्याने चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी कुणाल सोनवणे तसेच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान नगराध्यक्ष मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नगरसेवक अफजद पठाण, किशोर टोकसे यांनीही अपघातस्थळी दाखल होत परिस्थितीची माहिती घेतली.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या