लोणीच्या प्रा. साहेबराव गागरे यांची पीएच.डी.ला गवसणी!

लोणी (प्रतिनिधी योगेश कडसकर) :-
राहाता तालुक्यातील लोणी येथील लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील( पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाचे शिक्षक प्रा. साहेबराव रंभाजी गागरे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
“डेटा सायन्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नगरपालिका घनकचरा हाताळणी पद्धत” या विषयावर त्यांनी संशोधन केले. श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठ, झुनझुनू, राजस्थान यांनी त्यांच्या संशोधनाची दखल घेत पीएच.डी. पदवी जाहीर केली आहे.
या संशोधनासाठी डॉ. प्रसादू पेद्दी यांनी मार्गदर्शक, तर डॉ. बी. बी. आमले यांनी सहमार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रा. गागरे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील, शिक्षण संचालक तथा प्राचार्य प्रो. डॉ. प्रदीप दिघे आणि उपप्राचार्य डॉ. राम पवार यांनी अभिनंदन केले.
घनकचरा व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयाला आधुनिक डेटा सायन्स तंत्रज्ञानाची जोड देत केलेले हे संशोधन पर्यावरण आणि नगरपालिका व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रा. साहेबराव गागरे यांच्या या यशाबद्दल लोणी परिसरातून आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या