‘पिक्चरसाठी लूक केला?’ चर्चांना सलमानचं उत्तर; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर केस कापल्याचा खुलासा
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या नव्या लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. वजन कमी झाल्यानंतर आणि केस कापल्यानंतर सलमानने हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे का, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता. मात्र, या चर्चांना आता खुद्द सलमान खाननेच पूर्णविराम दिला आहे.
‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात सदस्यांशी संवाद साधताना सलमानने आपल्या टक्कल लूकमागचं कारण सांगितलं. पिक्चरसाठी किंवा कोणत्याही भूमिकेसाठी हा लूक केला नसल्याचे त्याने स्पष्ट केले.सलमानने सांगितले की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याच्या जवळच्या मैत्रिणीचे निधन झाले. तिच्या निधनानंतर त्याने केस काढण्याचा निर्णय घेतला. याच कारणामुळे त्याचा सध्याचा लूक असल्याचे सलमानने स्पष्ट केले.दरम्यान, सोशल मीडियावर सलमानने हेअर ट्रान्सप्लांट केल्याच्या चर्चाही सुरू होत्या. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्याने अशा गोष्टींचा आपल्यावर फारसा परिणाम होत नसल्याचे सांगितले.
कोण होती सलमानची मैत्रीण?
सलमानने आपल्या मैत्रिणीचे नाव कुमुद राणे असे सांगितले. तिचे ९ जून रोजी निधन झाले होते. कुमुद राणे यांच्या अंत्यसंस्काराला सलमानच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.कुमुद राणे यांचे पती जग्गी राणे हे देखील सलमान खानचे जवळचे मित्र असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कुमुद यांच्या निधनानंतर सलमानच्या लूकमध्ये झालेला बदल त्यांच्या आठवणीशी जोडला जात आहे.सलमानच्या टक्कल लूकमागे नेमकं कारण काय, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अभिनेत्याने स्वतःच उत्तर दिल्याने हेअर ट्रान्सप्लांटच्या अफवांनाही आता वेगळं वळण मिळालं आहे.
0 टिप्पण्या